1.
Dr. Geeta Yerlekar
माध्यमांतर ही आजच्या काळातील महत्त्वाची संकल्पना आहे. या कोर्सच्या निमित्ताने माध्यमांतराचे स्वरुप समजून घेण्याचा प्रयत्न आहे. प्रत्यक्ष माध्यमातर ही संकल्पना उपयोजनाच्या पातळीवर जाणून घेणे आवश्यक ठरते त्या अनुषंगाने मराठी साहित्याचे इतर माध्यमांत माध्यमांतर विशेषतः चित्रपटासारख्या दृश्य माध्यमांत कशा तऱ्हेने होते, त्यासाठी आवश्यक तंत्राची ओळख करुन घेणे आणि त्यानुसार माध्यमांतरीत कलाकृती व माध्यमांतरीत माध्यम यांचा सखोल अभ्यास महत्त्वाचा ठरतो. कादंबरी आणि नाटक या साहित्यप्रकारातील कलाकृतींचे माध्यमांतर होताना नेमक्या कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात, माध्यमांतरानुसार तंत्र कसे बदलते, त्या त्या माध्यमाचे असणारे विशेष या घटकांचा आधार घेत माध्यमांतराची संकल्पना समजून घेण्यात येईल. बदलत्या काळानुसार प्रेक्षकांची अभिरुची आणि होणारे माध्यमांतर यांचाही संदर्भ महत्त्वाचा ठरतो. थोडक्यात माध्यमांतराच्या माध्यमातून नेमक्या साहित्यातून चित्रपटाकडे या प्रवासाचा सूक्ष्मतेने अभ्यास या कोर्स अंतर्गत करण्यात येणार आहे.
Dr. Geeta Yerlekar
Dr. Durgesh Majik
Ms. Shraddha Dhond
Ms. Asmita PaiNaik